
गडचिरोलीत बुधवारी पोलीस कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. एटापल्ली तालुक्यातील झांबिया जंगलात ही चकमक झाली घटनास्थळावरून एके-47 रायफलसह अनेक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी एटापल्ली तालुक्यातील झांबिया जंगलात शोध मोहीम सुरू केली. यावेळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी दोन महिला माओवाद्यांना ठार मारले. सी-60 पथके आणि सीआरपीएफची 191 व्या बटालियन यांनी संयुक्त शोध मोहीम राबवली. यावेली घटनास्थळावरून एके-47, एक पिस्तूल, दारूगोळा आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य जप्त केले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली परिसरात नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. या मोहिमेचा भाग म्हणून झांबिया जंगलात ही कारवाई करण्यात आली.