
नवी दिल्लीत हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीच्या बलजीतनगरमध्ये दोन गटात हाणामारी झाली. तीन जणांमध्ये झालेल्या झटापटीत एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या परिसरात तणाव पसरला असून संतप्त जमावाने रास्ता रोको केला. तसेच या घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेत नितेश आणि आलोक हे दोन तरुण जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान नितेशचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात उफीजा, अदनान आणि अब्बास हे आरोपी असून त्यांचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.



























































