विमा एजंटची फसवणूक प्रकरणी दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांगला परतावा देतो असे सांगून विमा एजंटची 1 कोटी 89 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी दोघांना पश्चिम सायबर पोलिसांनी अटक केली. चैतन्य पडाळकर आणि दस्तगीर कासी अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हे विमा एजंट असून ते अंधेरीच्या सात बंगला येथे राहतात. गेल्या वर्षी त्याना एका खासगी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. त्या ग्रुपमध्ये अनेक सदस्य होते. तसेच त्या ग्रुपवर शेअरची माहिती दिली जात असल्याने तक्रारदार यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्याने 1 कोटी 89 लाख 53 हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्या गुंतवणुकीवर चांगला नफादेखील झाला होता. त्यामुळे त्याने ते पैसे काढण्याचा निर्णय घेतला.

मात्र पैसे निघत नव्हते. त्यामुळे त्याने ग्रुप अॅडमिनला संपर्क केला. ग्रुप अॅडमिनने त्यांना त्यांचा व्रेडिट स्कोअर कमी आहे. त्यामुळे आणखी शेअर खरेदीचा सल्ला दिला. तक्रारदार यांनी आणखी शेअर खरेदीस नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पश्चिम सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.