मेट्रो रेल्वेच्या ट्रक ट्रेलरने दोन दुचाकी स्वारांना चिरडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

मेट्रो रेल्वेच्या कामासाठी लोखंडी साहित्याची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रक ट्रेलरने ड्युटी आटोपून घरी परत जाणाऱ्या दोन दुचाकी स्वारांना चिरडले. ही घटना शनिवारी मध्यरात्री नंतर १.३०वाजताचे सुमारास वर्धमान नगर भागात घडली आहे. या पूर्वी मेट्रोच्या कामावरील क्रेनच्या धडकेत एल ए डी चौक भागात तीन मुलीचा मृत्यू झाला होता. आणखी किती जणांचे जीव मेट्रो घेणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

होरीलाल रामविलास वर्मा (२८) व नरेश इतवारी शाहू (३५) दोन्ही रा. डिप्टी सिंगनल अशी मयत झालेल्याची नावे आहेत. दोघेही भंडारा रोड वरील खाजगी कारखान्यात कामाला होते. ते २ डिसेंबर रोजी पहाटे १.३० वाजताचे सुमारास एम एच ४९ ए बी २६३७ क्रमांकाच्या दुचाकीने काम आटोपून घरी परत जात होते. वाटेत वर्धमान नगर रेल्वे क्रॉसिंग ते पावर हाऊस दरम्यान खोडियार धरम काट्याजवळ मेट्रोच्या कामावर लोखंडी राँड घेऊन जाणाऱ्या भरधाव एन एल ०२ क्यु ७०५३ क्रमांकाच्या ट्रक ट्रेलरने दुचाकीला धडक दिली. यात दोघेही ट्रेलरच्या चाकाखाली येऊन दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.