
माझ्यात दैवी शक्ती असून तुम्हाला करणी झाली असल्याचे सांगत एका भोंदू बाबाने उच्चशिक्षित दोन बहिणींनी अश्लिल चाळे केले. ही घटना पेâबु्रवारीत कोथरूड परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबाला जेरबंद केले आहे. याप्रकरणी भरत केदमाने ( वय ६५, रा. सोलापूर) याच्यावर विनयभंग आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विद्याथ्र्यांचे खासगी क्लास घेत असून त्यांची बहीण डॉक्टर आहे. मागील काही दिवसांपासून महिलेच्या क्लासमध्ये विद्यार्थी शिकवणूकीसाठी येत नव्हते. त्यामुळे महिला तणावग्रस्त असताना डॉक्टर बहिणीकडे रुग्णालयात गेली. त्यावेळी रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याने भरत केदमाने याची माहिती पीडितेला दिली. त्यानंतर महिलेची आणि भरतची ओळख झाली. काही दिवसांनी भरतने महिलेला माझ्याकडे दैवी शक्ती आहे. तुमच्यावर करणी झाली असून तुमचे क्लासेस चालत नाही, त्यासाठी काही विधी करावे लागतील असे सांगितले. विधीसाठी भरतने महिलेकडून सात हजार रुपये घेतले. त्यानंतर एकट्याने विधी करता येत नसल्याचे सांगत त्याने फिर्यादी महिलेच्या बहिणीलाही कोथरुडमध्ये बोलावले. त्याठिकाणी विधी करण्याच्या बहाण्याने भरत याने दोन्ही उच्चशिक्षित बहिणींसोबत अश्लील चाळे केले.
करणी काढण्याच्या बहाण्याने फसवणूक आणि विनयभंग झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलांनी कोथरुड पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्याला जेरबंद केले . अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.



























































