
ऑपरेशन सिंधू अंतर्गत पाकिस्तान व पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंदुस्थान थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत पोहोचला. इस्लामाबाद, लाहोर, कराची, पेशावर सारख्या महत्त्वाच्या शहरांवर हिंदुस्थानने हल्ले केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मू कश्मीरच्या सीमा भागात तुफान गोळीबार व उखळी तोफांचा मारा केला. या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
View this post on Instagram
एक जवान शहीद
कश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात मुरली नाईक हे मुंबईतील घाटकोपरचे जवान शहीद झाले आहेत. कश्मीरमध्ये उरी येथे पाकड्यांशी लढताना आज पहाटे 3.30 वाजता मुरली नाईक यांना वीरमरण आले.
हिंदुस्थानने पाकिस्तानची AWACS प्रणाली नष्ट केली
हिंदुस्थानने गुरुवारी रात्री पाकिस्तानची एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम AWACS प्रणाली नष्ट केली. यामुळे पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे. हिंदुस्थानने गुरुवारी पाकड्यांची पाच लढाऊ विमानेही पाडली.
सुरक्षा दलांच्या हालचालींचे लाईव्ह कव्हरेज टाळा – केंद्रांचे आदेश
हिंदुस्थान-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व माध्यम चॅनेल, डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सुरक्षा दलांच्या कारवाया आणि जवानांच्या हालचालींचे थेट कव्हरेज किंवा लाईव्ह रिपोर्टिंग टाळा, अशा सूचना केंद्राने माध्यमांना दिल्या आहेत. याबाबत एक पत्रक जारी करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी आणि शुक्रवारीही अनेक चॅनेल्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म युजर्सने मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती प्रसारित केली. त्यामुळे ही सूचना जारी करण्यात आली आहे.