जम्मू कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लियाकत अहमद व वाजिद अशी त्या दहशतवाद्यांची नावे असून ते पुलावामा जिल्ह्यातीलच रहिवासी आहेत. या चकमकीनंतर पुलवामा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील तिकून गावात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. त्यानंतर या गावात शोधमोहीम सुरू करण्यात आलेली. या मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.