पुलवामामध्ये चकमक ;जैशच्या म्होरक्यासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरातील पुलवामामध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर यासिर पारेचा समावेश आहे, तर फुरकान एलियास अली असे दुसऱया पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव आहे. यासिर हा बॉम्ब बनवण्यात माहिर होता. दहशतवाद्यांविरोधातील चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले, असे कश्मीरचे आयजी विजय पुमार यांनी सांगितले.

यासिर आणि फुरकान या दोघांचा हिंदुस्थानात करण्यात आलेल्या अनेक दहशतवादी कारवायांमागे हात होता. बुधवारी हे दहशतवादी पुलवामाच्या कसबा यार भागात लपल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जम्मू-कश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने संयुक्त शोधमोहीम सुरू केली आणि चकमकीत दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. चकमक झालेल्या ठिकाणावरून दोन एके-47, दोन पिस्तूल तसेच इतर शस्त्र्ाास्त्र्ाांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.

यासिरने आखला होता पुलवामा हल्ल्याचा कट

यासिर पारेने 2019 मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभाग घेतला होता, अशी माहिती पुढे आली आहे. तो पाकिस्तानी दहशतवादी अबू सेफुल्ला ऊर्फ लंबू याचा साथीदार होता. सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्याच्या अबूच्या कटामध्ये यासिरने मदत केली होती.

  • फुरकान हा 26 जूनपासून जैश-ए-मोहम्मदसाठी काम करीत होता. त्याला कश्मीरात कट्टरता पसरवण्यासाठी पाठवले गेले होते. तो तरुणांना व्यावसायिकांविरुद्ध शस्त्र्ाs चालवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचा.
  • यासिर हा पुलवामाच्या कासबयार येथील रहिवासी होता. तो 20 जून 2019 रोजी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदमध्ये दाखल झाला होता. पाकिस्तानींना कश्मीरात आणण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले होते.