सामना प्रतिनिधी, वाडा
रविवारच्या सुट्टीनिमित्त मौजमजा करण्यासाठी आलेल्या मालाडच्या दोघा तरुणांचा तानसा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. प्रसाद शिंदे (26) व अनिष मोरे (25 ) अशी त्यांची नावे असून ते दोघेही एकाच कुटुंबातील आहेत.
शिंदे व मोरे हे मूळचे वाडा तालुक्याच्या उचाट येथील शिंदेवाडीत राहणारे होते. दोन्ही कुटुंबे एकत्रच असून ते नोकरीनिमित्त मालाडमध्ये राहत होते. आज सुट्टीनिमित्त आयोजित केलेल्या गेट टुगेदरसाठी प्रसाद व अनिष हे दोघे मालाडहून आले. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास तानसा नदीत पोहण्यासाठी गेले. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.



























































