योगी साधना, कोलकात्याचा पूल यूपीत हलवला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजपने आगामी विधानसभा निवडणुकाची जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘ट्रान्सफॉर्मिंग उत्तर प्रदेश अंडर योगी आदित्यनाथ’ अशी जाहिरातबाजी करणाऱया भाजप सरकारने चक्क पश्चिम बंगालमधील कोलकात्याचा पूल यूपीत हलविला. वृत्तपत्रातून छापून आलेल्या एका जाहिरातीवरून योगी सरकार चांगलेच वादात सापडले आहे.

उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील विकासकामे दाखवणारी एक पानभर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पह्टो आहे. तसेच राज्याची प्रगती आणि विकास दाखवण्यासाठी इतरही पह्टो देण्यात आले आहेत. या पह्टोत एक पूलही दाखवला आहे. हा पूल कोलकात्याचा आहे. तसेच पश्चिम बंगालची ओळख असलेली पिवळी टॅक्सी पुलावरून धावतानाही दिसते आहे. यावरून तृणमूल काँग्रेसने उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी ट्रान्सफार्मिंग यूपी म्हणजे पश्चिम बंगालमधील पायाभूत सुविधांचे पह्टो चोरणे, असे आहे का, असा सवाल ट्विट करत केला आहे. तर मुपुल रॉय यांनी यूपीत मुख्यमंत्री बदलता येत नसल्याने पंतप्रधान मोदी हे असहाय्य दिसत आहेत. आता यूपी सरकार हे पायाभूत सुविधा आणि विकासाचा दावा करताना पश्चिम बंगालमधील पह्टो दाखवत आहे, अशी टीका केली आहे.

उत्तर प्रदेश सरकारकडून दिलगिरी

दरम्यान, जाहिरातीवरून राजकीय वादाला तोंड फुटल्याने उत्तर प्रदेशच्या माहिती प्रसारण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी या प्रकाराबाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच पब्लिशरमुळे ही चूक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित वृत्तपत्रानेही यासंदर्भात दिलगिरी व्यक्त करत आक्षेप घेण्यात आलेले पह्टो हे जाहिरातीतून हटवण्यात आले असल्याचे म्हटले आहे.