
पाच वर्षांची चिमुरडी कियारा कौर हिने दोन तासांमध्ये 36 पुस्तकांचे वाचन करून जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
मूळ हिंदुस्थानी वंशाची असलेली कियारा सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहते. नर्सरीत शिकताना तिची वाचनाची आवड एका शिक्षकाने ओळखली. पण कोरोनामुळे शाळा बंद झाली. त्यामुळे कियारालाही घरी बसावं लागलं आहे. तिला पुस्तकं काचायला खूप आकडतं असं कियाराच्या पालकांनी सांगितलं आहे. गेल्या एका वर्षात तिनं तब्बल 200 पुस्तकं वाचली आहेत. नुकतेच तिने 105 मिनिटांत तिने 36 पुस्तकांचे वाचन केले. तिच्या या कर्तृत्काची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. वेगात सर्वाधिक पुस्तकं वाचण्याचा जागतिक विक्रम तिच्या नावे नोंदवला गेला आहे.
























































