
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. एका कार्यक्रमात बंडू जाधव म्हणाले की, “ठाकरेंशिवाय शिवसेना ही असूच शकत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा आजचे मुख्यमंत्री पाळण्यात लोळत होते. आणि त्यांनी शिवसेनेवर हक्क सांगावा हे आम्हाला आणि महाराष्ट्रातील जनतेलाही पटलेलं नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरेंचीच होती आहे आणि राहणार, यात दुमत नाही,” असं बंडू जाधव यांनी सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी बंडू जाधव यांनी म्हटलं होतं की, “ मी एका सामान्य कुटुंबातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमुळे आमदार, मार्केट कमिटी, खासदार अशा पदांवर काम करण्याचं भाग्य मिळालं. त्यामुळे हा जन्म काय, सात जन्म मी पक्षाचे उपकार फेडू शकणार नाही. मला एवढं दिलं आहे. त्यामुळे पन्नास खोके काय, शंभर खोके आले तरी माझ्या उंचीसमोर ते खूप ठेंगणे आहेत.”


































































