उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने शिवसैनिक सुखावला, खवय्यांना 5 रुपयांत वडापाव दिला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात झालेल्या सत्तासंघर्षानंतर महाविकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं ते उद्धव ठाकरे या पदी विराजमान झाल्याने तमाम शिवसैनिक प्रचंड आनंदीत झाले आहेत. कल्याणमधल्या एका शिवसैनिकाने हा आनंद एकटा साजरा करण्याऐवजी जनतेसोबत साजरा करण्याचं ठरवलं. दिनेश शेटे नावाच्या या शिवसैनिकाने 5 रुपयांत वडापाव देण्याचं ठरवलं.

wadapav-crowd

कष्टकरी जनतेसाठी वडापाव हा भूक भागवण्यासाठीचा मुख्य आधार असतो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे कष्टकऱ्यांचे सरकार आहे आणि ते त्यांचा आधारही आहे. यामुळेच वडापावचे दर कमी करून ते जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय शेटे यांनी घेतला होता.

5-rs-wadapav-for-uddhav-tha

कल्याणमधल्या टिळक चौकामध्ये शेटे यांनी शुक्रवारी 5 रुपयांत वडापाव विकणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या छोटेखानी दुकानाबाहेर वडापाव खाण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ग्राहक रांग लावून वडापाव घेताना दिसत होते.

crowd-for-wadapav

‘उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री होणं हा आमच्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण आहे, या आनंदात आम्हाला शक्य तितक्या जनतेला सहभागी करून घेण्याचा आमचा विचार होता म्हणूनच आम्ही 5 रुपयांत वडापाव विकण्याचे ठरवले’ असे शेटे यांनी म्हटले आहे.