आज वचनपूर्ती झाली… हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होणार! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार!! मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले नेते आहेत. मंगळवारी संध्याकाळी हॉटेल ‘ट्रायडंट’ येथे झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केल्यावर रात्री उशिरा राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. गुरुवार, 28 नोव्हेंबरला सायंकाळी 6.40 वाजता नव्या सरकारचा शपथविधी शिवतीर्थावर जल्लोषात होणार आहे. नवे सरकार 3 डिसेंबर रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहे.
राज्यातील सत्तासंघर्षात भाजप सरकार कोसळल्यानंतर शिकसेना-काँग्रेस-राष्ट्रकादी या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र किकास आघाडीच्या नावाचा ठराक शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी मांडला. त्याला स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, प्रहारचे बच्चू कडू, लोकभारतीचे कपिल पाटील यांनी अनुमोदन दिले.
जयंत पाटील यांचा ठराव
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी या विकास आघाडीचं नेतृत्व करावं असा ठराव मांडला. त्यास काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले.






























































