
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना शाखाभेटी आणि शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी युती उमेदवारांच्या निवडणूक कार्यालय उद्घाटनाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या शाखेत येत असल्यामुळे उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांच्याही उत्साहाला उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी आज प्रभादेवी, वरळी, लालबाग, चिंचपोकळी आदी भागातील शाखांना भेटी दिल्या. यावेळी तेजस ठाकरे उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळी प्रभाग 193 येथे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या शाखेला भेट देत निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले. यानंतर प्रभाग क्र. 194 चे युतीचे उमेदवार शिवसेनेचे निशिकांत शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, उपनेते आमदार सचिन अहीर, आमदार सुनील शिंदे, आमदार मनोज जामसुतकर, मनसे नेते बाळा नांदगावकर, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर यांच्यासह शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी युतीला जोरदार प्रतिसाद
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रभाग क्र. 195चे उमेदवार शिवसेनेचे विजय भणगे, प्रभाग क्र.196च्या उमेदवार शिवसेनेच्या पद्मजा चेंबूरकर, प्रभाग क्र. 197 च्या उमेदवार मनसेच्या रचना साळवी, प्रभाग क्र. 198 येथील उमेदवार शिवसेनेच्या अबोली खाडये, प्रभाग क्र. 199 च्या उमेदवार शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, प्रभाग क्र. 207च्या उमेदवार मनसेच्या शलाका हरियाण, प्रभाग 210 उमेदवार शिवसेनेच्या सोनम जामसुतकर, प्रभाग क्र. 209च्या उमेदवार मनसेच्या हसिना माईणकर, प्रभाग क्र. 208 चे उमेदवार शिवसेनेचे रमाकांत रहाटे आणि शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. 202 ते 206चे उमेदवार शिवसेनेच्या श्रद्धा जाधव, भारती पेडणेकर, किरण तावडे, सुप्रिया दळवी, सचिन पडवळ यांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन झाले.
वरळीतील शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 193च्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी तेजस ठाकरे, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
































































