
लंडनच्या हडर्सफील्ड वेस्ट यॉर्क येथून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. जिथे एका महिलेने एकाच वेळी तीळ्या मुलींना जन्म दिला. जेव्हा डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता आश्चर्यकारक माहिती मिळाली. अशा मुलांच्या जन्माचे प्रमाण 200 दशलक्षांपैकी एक म्हणजे 20 दशलक्ष आहे. सध्या या तिळ्यांची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
दोन सारखी दिसणारी मुले एकत्र जन्माला येण्याची प्रकरणे खूप सामान्य आहेत. त्यांना जुळे म्हणतात. पण अशी तीन बाळ एकत्र जन्माला येण्याचे प्रमाण लाखात एक आहे. ते दुर्मिळ आहे. याविषय मुलींची आई लॉझी आणि वडील गॅरेथ यांनी त्यांच्या तीन मुली विलो, नॅन्सी आणि मेबेल डेव्हिसकडे पाहिले तेव्हा त्यांना त्यांचे चेहरे एकसारखे आढळले. त्यानंतर त्यांनी या मुलींच्या जन्माच्या आठ आठवड्यांनंतर चाचणी केली, ज्यामुळे कुटुंब आणि डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. तपासणीत त्या अत्यंत दुर्मिळ, एकसारख्या दिसणाऱ्या तिळ्या असल्याचे समोर आले. गरोदरपणाच्या 12व्या महिन्यात जेव्हा लॉझीच्या पोटाचे स्कॅनिंग करण्यात आले तेव्हा या जोडप्याला समजले की ती तिळ्या मुलांना जन्म देणार आहे. अशी मुले जन्माला येण्याचे प्रमाण 200 दशलक्षांपैकी एक म्हणजे 20 दशलक्ष आहे.
इंग्रजी वेबसाईट द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तिघांचाही जन्म गेल्या वर्षी 10 नोव्हेंबरला झाला होता. विलोचे वजन चार पाऊंड, , नॅन्सी 5 पाऊंड आणि मेबेल 4 पाऊंड असे होते. या प्रकरणात तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत कारण सहसा तीन मुले अनुवांशिकदृष्ट्या एकसारखी नसतात, परंतु या प्रकरणात तसे होते. अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत उघडकीस आलेले हे तिसरे प्रकरण आहे. ज्याने तज्ज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.























































