
बिहारमधून १४ नोव्हेंबरनंतर बेरोजगारी दूर होईल, असं वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव म्हणाले आहेत. आरजेडी अध्यक्ष लालूप्रसाद यादव, राबडी देवी आणि बिहार तेजस्वी यादव दिल्लीला रवाना झाले आहेत. राऊस अव्हेन्यू कोर्टात सोमवारी लँड फॉर जॉब प्रकरणी सुनावणी होणार आहे. दिल्लीला रवाना रवाना होण्याआधी माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
तेजस्वी यादव म्हणाले आहेत की, “आम्ही कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरकारी नोकरी देऊ. १४ नोव्हेंबरनंतर बिहारमधून बेरोजगारी गायब होण्यास सुरुवात होईल.” दरम्यान, महाआघाडीतील जागावाटपासंदर्भात आरजेडी नेते भाई वीरेंद्र यांनी सांगितलं आहे की, “जागावाटपाबाबत जवळपास सर्व निश्चित झालं आहे. सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली जाईल, जिथे सर्व माहिती दिली जाईल.”