अमित शहा मुंबईत; शिंदे-फडणवीसांसोबत बंद दाराआड चर्चा, अजित पवार गैरहजर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत आल्यावर अमित शहा यांनी सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आले आणि तिथे दर्शन घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या ‘सागर’ या बंगल्यावर गेले.

गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा झाली. मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. तसेच मुंबई विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतही अजित पवारांचे नाव होते. या कार्यक्रमाला अमित शहा हजर होते, मात्र अजित पवारांनी दांडी मारली.

80-90 टक्के आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत; चिन्हाचा फैसला ऑक्टोबरमध्ये होणार!