हिंदुस्थानातील सामाजिक न्यायासाठी एकजूट करा! तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील कट्टरतावादी आणि धार्मिक नेतृत्कामुळे हिंदुस्थानातील सामाजिक, सांस्कृतिक एकता धोक्यात आली आहे. त्यामुळे देशातील अत्याचारित जनतेच्या भल्यासाठी आणि सामाजिक न्यायाच्या सुरक्षेसाठी एकजूट करा, असे आवाहन तामीळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी काँग्रेससह देशभरातील 37 राजकीय पक्षांना केले आहे.

सामाजिक न्यायासाठी अखिल भारत संघटना’ स्थापन करण्याची घोषणा स्टॅलिन यांनी प्रजासत्ताकदिनी केली होती. त्यानंतर आता त्यांनी देशभरातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अण्णा द्रमुक या पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून वैविध्यपूर्ण असलेली आपली सांस्कृतिक एकता टिकविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रातील कट्टरतावादी नेतृत्वाला विरोध

  • केंद्रातील कट्टरतावादी आणि धार्मिक वर्चस्वामुळे आपली अद्वितीय, वैविध्यपूर्ण, बहुसंस्कृती असलेल्या देशाचे ऐक्य धोक्यात आले आहे.
  • समानता, स्काभिमान, सामाजिक न्याय यांच्यावर विश्वास असलेल्यांविरोधात या कट्टरतावादी शक्ती लढत
    आहेत. त्यामुळे त्यांविरोधात लढण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे.
  • यामुळे काय राजकीय फायदा होणार, हा प्रश्न महत्त्काचा नसून आपल्या प्रजासत्ताकाची विविधतावादी ओळख पुनर्स्थापित करण्यासाठी आपण हे पाऊल उचलणे गरजेचे आहे.