मुंबई विद्यापीठाचा 724 कोटींचा अर्थसंकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थीकेंद्रित आणि सर्वसमावेशक असा 2021-22 वर्षीचा 724 कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात तब्बल 78 कोटी 53 लाख रुपये इतकी तूट दाखविण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या अधिसभेत हा अर्थसंकल्प मांडण्यात आला.

अर्थसंकल्पामध्ये विविध नावीन्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांकर भर देण्यात आला आहे. यामध्ये विद्यापीठ उप परिसरातील पायाभूत सुविधा डिसेबल्ड फ्रेण्डली कॅम्पसेस, शैक्षणिक सुकिधा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र, विद्यापीठ परिसराचे सुशोभीकरण, सिंधुदुर्ग उपपरिसर, इन्क्युबेशन सेंटर अशा वैविध्यपूर्ण, नावीन्यपूर्ण उपक्रमांवर आधारित विशेष अर्थसंकल्पीय तरतुदींसह विद्यापीठ सुधारणांवर भर देण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्रासाठी 9 कोटींची तरतूद केली आहे.