
उदगीर शहरातील आडत लाईन जवळ आजीसोबत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस अज्ञात दोन महिला व दोन पुरुषांनी फूस लावून पळवले आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या वडिलांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादीची आई ही उदगीर येथील आडत लाईन जवळील महादेव मंदिराजवळ राहते. तिच्या देखभालीसाठी फिर्यादीची अल्पवयीन मुलीगी ही मागील दोन महिण्यांपासून त्यांच्याजवळ राहात होती. 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची मुलगी ही तिच्या आजीसोबत भांडण करून घरातील काही रुपये घेऊन अनोळखी दोन महिला व दोन पुरुषांसोबत गेली. फिर्यादीस मोबाईलवर ही माहिती त्यांच्या आईने सांगीतल्यानंतर ते उदगीर येथे पोहचले, मुलीचा सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही म्हणून शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

























































