
कांजुरमार्ग पूर्व येथे माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवराय व वारकरी शिल्पाचे अनावरण शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी नीलेश महाराज कोर्डे, आमदार रमेश कोरगावकर, राजूल पाटील, संदीप सावंत, अनंत पालाडे, सिद्धी जाधव, बाळू ठाकूर, रवी महाडिक आदी उपस्थित होते.































































