राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, भुजबळांनी व्यक्त केला विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जून महिन्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. यापार्श्वभूमिवर सहाव्या जागेवर शिवसेनेने आपला उमेवार दिला आहे. त्यातच छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असला निर्णय जाहीर केला होता. मात्र नंतर त्यांनी त्यातून माघार घेताना शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर खुद्द छत्रपती संभाजी राजे यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी यामागे भाजप आणि देवेंद्र फडणवीस असल्याचं विधान केलं होतं. त्यावर आणि सहाव्या जागेच्या संदर्भात नाशिकचे पालकमंत्री, राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शाहू महाराजांच्या विधानाला अत्यंत अनुभवी आणि परिपक्व म्हणत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील अशी खात्री असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘शाहू महाराजांनी केलेलं विधान अतिशय मॅच्युअर्ड ज्याला आपण विचारपूर्वक म्हणतो तसं हे विधान शाहू महाराजांनी केलं आहे’, असं छगन भुजबळ म्हणाले. ‘मला वाटतं त्यावर अधिक उलटसुलट चर्चा करणं योग्य होणार नाही. कारण ते ज्या गादीवर बसलेले आहेत ज्या गादीला सारा महाराष्ट्र, मराठी माणूस नमस्कार करतो. त्या गादीवरून त्यांनी अतिशय अनुभवी आणि अतिशय परिपक्व असं विधान केंल आहे. त्यावर वाद नको’, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आणि वरिष्ठ नेते त्यामध्ये लक्ष घालत आहेत. निश्चितपणे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील या मला तरी खात्री आहे, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

मोघम बोलण्यात काही अर्थ नाही, पण आमच्यासडे असलेली मतं शिवसेना आणि काँग्रेसकडे असलेली मतं आणि अपक्षं मतं धरून महाविकसास आघाडीला कुठेही अडचण होणार नाही, असं भुजबळ यांनी स्षष्ट केलं.

राज्यसभेच्या निवडणुकीच्यावेळी महाराष्ट्राच्या सहाव्या जागेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने संजय पवार यांनी उमेदवारी देत विजयाचा दावा याआधीच केला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत राजकीय रंगत वाढत चालली आहे.