नोकरीचे आमिष; 48 लाखांची फसवणूक, आरोपी जेरबंद

324
crime

बेरोजगार तरुणांना कस्टम, एक्साईझमध्ये विविध पदांवर नोकरी लावून देतो अशी बतावणी करून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या आरोपी इसम संतोष मारुती पाटील याला नवीमुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष मारुती पाटील (41) याने सेंट्रल एक्साईज ,कस्टम विभागात विविध पदावर नोकरी लावतो, अशी बतावणी करीत आणि नोकरीची अमिश दाखवीत. त्याचे नातेवाईक, शेजारी व मित्रमंडळी अशा एकूण 130 ते 140 व्यक्तींकडून सुमारे 48 लाख रुपये रोख रक्कम त्याच्या बँक खात्यावर स्विकारली आहे. संबंधितांना नोकरी लागल्याबाबत बनावट कामावर हजर केल्याचे पत्र, सर्व्हिस बुक, मेडिकल कार्ड आदी कागदपत्रे देऊन त्यांची दिशाभूल करीत त्यांची फसवणूक केली. जमा करण्यात आलेली रक्कम घेऊन मागील 4 महिन्यांपासून फरार झाला होता. स्वतःचे अस्तित्व लपवून राहत असलेल्या संतोष पाटील यास नवीमुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्ष – 2 च्या पोलिस पथकाने मोठ्या शिताफीने गजाआड केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या