या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय रिषभ पंत?

1279

बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यातील प्रेमसंबंध जुने आहेत. अनेक अभिनेत्री व क्रिकेटपटूंची लग्न झालेली आपण पाहिलेली आहेत. आता आणखी एक प्रसिद्ध क्रिकेटपटू एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. सध्या टीम इंडियात त्याची जागा मजबूत करण्यासाठी मेहनत घेत असलेला क्रिकेटपटू रिषभ पंत याचे अभिनेत्री उर्वशी रौटेला सोबत सूत जुळल्याचे समजते.

urvashi-routela

दोन दिवसांपूर्वी उर्वशी व रिषभ हे मुंबईतील एका हॉटेलमध्ये डिनर डेटवर गेले होते. त्यानंतर रिषभ उर्वशीला सोडायला तिच्या घरापर्यंत देखील गेला होता. त्यांच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या अफेयरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. याआधी उर्वशी रौतेला हिचे टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दीक पांड्यासोबत अफेयरच्या चर्चा रंगल्या होता. मात्र सध्या हार्दीक मॉडेल नताशा स्टॅकोविक हिला डेट करत असल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या