अमेरिकेने बदला घेतला, बगदाद विमानतळावरील रॉकेट हल्ल्यात कासिम सुलेमानीचा खात्मा

713

अमेरिकेने इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय  विमानतळावर हवाई हल्ला केला. इराकी मिलिशियाने हा दावा केला असून या हवाईहल्ल्यात इराणचे लष्करी अधिकारी आणि कुड्स दलाचे प्रमुख कासिम सुलेमानी हा ठार मारले गेले आहे.या हल्ल्यामध्ये मिलिशिया कमांडर अबू महदी अल-मुहांडीस हा देखील मारला गेला आहे.

sulemani

या दोघांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.इराण समर्थित इराक मिलिशियाचे प्रवक्ते  अहमद अल-असदीने या हल्ल्याला आणि कासि सोलेमानी, अबू महदी अल-मुहांडिस यांच्या मृत्यूला अमेरिका आणि इस्रायल जबाबदार आहे.

baghdad-us-soldiers

अमेरिकेनं नुकतेच इराकमध्ये हल्ले केले होते. इराणचा पाठिंबा असलेल्या आणि हिंसक, सशस्त्र कारवाया करणाऱ्यांच्या इराकमधील ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. या हल्ल्यांमुळे इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करण्यात आला.

baghdad-us-counsulate

यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी अमेरिकी सैन्यानं अश्रूधुराचा वापर केला होता. आंदोलकांनी दूतावासाबाहेरील एका सुरक्षा चौकीला आग लावली.

baghdad-us-counsulate-prote

या हल्ल्यामागे इराणच असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटले होते. या हल्ल्याची इराणला मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटद्वारे दिला होता. शुक्रवारी झालेला हल्ला हा त्याचाच परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.

baghdad-protestor

‘कुड्स’ सेना काय आहे?
कुड्स दल हे इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्सची एक तुकडी आहे. देशाबाहेरच्या मोहिमा आखणे आणि पूर्ण करणे याची जबाबदारी या दलाकडे सोपवण्यात आली होती. या दलाचा प्रमुख थेट आयतोल्लाह अली खोमेनी यांना उत्तरदायी होते. इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानी हे या तुकडीचे प्रमुख होते.  2003 साली अमेरिकेच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे इराकमधील सद्दाम हुसेन यांची राजवट संपुष्टात आली होती. इथे निर्माण झालेल्या पोकळीमुळे अराजकता माजली होती. इराणच्या कुड्स दलाने याचा फायदा उचलत त्यांच्या कारवाया वाढवायला सुरुवात केली.

quasim-solemani

कुड्स दलाला इराणचे समर्थन करणाऱ्या अन्य देशातील विरोधी गटांनी शस्त्रास्त्रे, पैसे आणि प्रशिक्षण देण्यास सुरुवात मोठ्या प्रमाणावर सुरूवात केली होती. कुड्सने नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक युद्धनितीचे शिक्षण घेतले. त्यांनी स्वॉर्म तंत्र शिकून घेतले ज्यामध्ये बलाढ्य सैन्यासोबत लढण्यासाठी वेगवेगळ्या जागांवरून हल्ला करण्याचे तंत्र सामील आहे. यशिवाय ड्रोन आणि सायबर हल्ल्यांचं तंत्रही या दलाने शिकून घेतलं आणि त्याचा विध्वंसक पद्धतीने वापर करायला सुरुवात केली.

baghdad-protest

अमेरिकेने या दलाला गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं.इतर देशाच्या सरकारशी निगडीत लष्करी तुकडीला दहशतवादी संघटना घोषित करण्याची ही अमेरिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ होती. इराणने याचा कडाडून विरोध करताना अमेरिकेवर टीका केली होती. आखाती भागात अमेरिकाच दहशतवादी संघटनेप्रमाणे वागत असल्याचं इराणने म्हटलं होतं. 2001 पासून 2006 दरम्यान इंग्लंडचे परराष्ट्र मंत्री जॅक स्ट्रॉ अनेकदा इराणच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांचं म्हणणं आहे की कासिम सुलेमानी याच्याकडे फक्त एक लष्कराचा कमांडर म्हणून पाहता येणार नाही. सुलेमानी हा ताकदीच्या जोरावर इराणसाठी परराष्ट्र धोरण ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.

कताईब हिजबुल्लाहदेखील अमेरिकेच्या निशाण्यावर
कताईब हिजबुल्लाह इराकमध्ये अमेरिकेच्या तळांवर सातत्याने हल्ले करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. 2009 साली अमेरिकेने कताईब हिजबुल्लाहला दहशतवादी संघटना घोषित केले. त्याचा म्होरक्या असलेल्या अबू महदी अल-मुहांडीस हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याचंही अमेरिकेने घोषित केलं होतं. ही दहशतवादी संघटना इराकसाठी धोकादायक असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे.कताईब हिजबुल्लाहचे संबंध हे थेट कुड्स दलाशी होते आणि इराणकडून त्यांना सगळ्या प्रकारची मदत केली जात होती.

आपली प्रतिक्रिया द्या