जगातील सर्वात मोठय़ा विमानाचे चाचणी उड्डाण

84

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन

तब्बल दोन विमानांएवढी जागा आणि बोईंग-747 विमानांची सहा इंजिन्स असलेल्या जगातल्या सर्वात मोठय़ा विमानाचे चाचणी उड्डाण कॉलिफोर्नियात यशस्वीरीत्या पार पडले.

‘स्ट्राटोलॉन्च बेहेमोथ’ असे नाव असलेल्या या रिकाम्या विमानाने मोजावे वाळवंटात शनिवारी प्रवास केला. या विमानाचे वैशिष्टय़ म्हणजे ते जमिनीवरून थेट अंतराळातही जाऊ शकते. सरळ आकाशात झेपावणारे रॉकेट उपग्रह अंतराळात धाडण्याचे जे काम करते. तेच काम हे महाकाय विमानही करू शकणार आहे. पण त्याचा प्रवास इतर विमानांसारखाच असेल अशी माहिती या विमान प्रोजेक्टचे सीईओ जेन फ्लॉइड यांनी दिली. शनिवारी हे विमान जवळपास अडीच तास आकाशात भ्रमण करत होते. या विमानाचा ताशी वेग 304 किलोमीटर एवढा महाप्रचंड आहे.

आपली प्रतिक्रिया द्या