
आपण रोज जे पाणी पितो, जी हवा श्वासात घेतो, त्यातून सूक्ष्म प्लास्टिकचे कण (मापोप्लास्टिक) आपल्या शरीरात जातात. हे कण इतके सूक्ष्म असतात की, आपल्याला ते दिसतही नाहीत, पण कर्करोग, दम्याचे झटके यांसारख्या गंभीर आजारांपर्यंत या प्लास्टिकचे परिणाम होऊ शकतात. खाण्यापासून, पिण्याच्या पाण्यातून किंवा आपण श्वास घेतो त्या हवेमधूनही शरीरात गेलेले मापोप्लास्टिकचे कण ते लाळ, रक्त, थुंकी, आईचे दूध अशा शरीरातील द्रवांमध्ये आणि यकृत, मूत्रपिंडं, प्लीहा, मेंदू आणि अगदी हाडांच्या आतही सापडले आहेत. हे प्लास्टिक आपल्या आरोग्यावर नेमकं काय परिणाम करत आहे? काही विशिष्ट प्रकारचे मापोप्लास्टिक्स हाडं आणि स्नायूंच्या पेशी वाढण्यात अडथळा आणतात. शास्त्रज्ञांच्या मते, या मापोप्लास्टिकमुळे आजार अधिक गंभीर होत जातात. रक्तवाहिन्यांमध्ये मापोप्लास्टिक्स आढळल्यास स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा अचानक मृत्यूचा धोका साडेचारपट जास्त होतो. एका नव्या अभ्यासात माणसांच्या मृतदेहांच्या मेंदूत मापोप्लास्टिक्स सापडले. ज्यांना मृत्यूपूर्वी स्मृतिभ्रंश होता. आपल्या शरीरात साचणारे मापोप्लास्टिक हे घातक रसायनासारखं (जसं की एस्बेस्टॉस) थेट नुकसान करत नाही, परंतु, हे शरीरातल्या पेशींना कमकुवत करते. त्यामुळे आजार होण्याची शक्यता जास्त वाढते.



























































