
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या गाडीवर उत्तर प्रदेशातील मेरठजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत आपल्या गादीवर चार राउंड फायर झाल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात त्यांना कोणतीही हानी झाली नसून ते सुखरूप असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे.
ओवेसी यांनी आपल्या ट्विटमध्ये या घटनेची माहिती देताना सांगितलं की, ”काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटजवळ माझ्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. 3 ते 4 लोकांनी माझ्या गाडीवर चार राउंड फायरिंग करून सर्व शस्त्रे तेथेच सोडून पळ काढला. मात्र मी दुसऱ्या गाडीत बसून तेथून निघालो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत.”, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
कुछ देर पहले छिजारसी टोल गेट पर मेरी गाड़ी पर गोलियाँ चलाई गयी। 4 राउंड फ़ायर हुए। 3-4 लोग थे, सब के सब भाग गए और हथियार वहीं छोड़ गए। मेरी गाड़ी पंक्चर हो गयी, लेकिन मैं दूसरी गाड़ी में बैठ कर वहाँ से निकल गया। हम सब महफ़ूज़ हैं। अलहमदु’लिलाह। pic.twitter.com/Q55qJbYRih
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 3, 2022
दरम्यान, ओवेसी यांच्या गाडीवर गोळी झाडल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.
























































