उत्तराखंडात भूस्खलन  होऊन 80 रस्ते बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडामध्ये गेल्या 24 तासांत अनेक भागांत हलक्या ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून राज्यातील 80हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मसुरी-देहराडून मार्गावर पाणीवाला बेंडजवळ रस्त्याचा काही भाग खचला.