लसीकरण उत्सव… पण लसीची व्यवस्थाच नाही प्रियांका गांधी यांचे केंद्रावर टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील लसीकरणाच्या बोजवाऱ्याबद्दल काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘लसीकरण उत्सव साजरा केला, पण लसीची व्यवस्थाच नाही’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

‘हिंदुस्थान हा सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. मोदी सरकारने 12 एप्रिल रोजी लसीकरण उत्सव साजरा केला. परंतु कोरोना लसीची कोणतीच व्यवस्था केली नाही आणि या 30 दिवसांत आमच्या देशातील लसीकरण 82 टक्क्यांनी कमी झाले.’ असे प्रियांका यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना लस तयार करणाऱ्या कंपन्यांकडे गेले. फोटो काढले. पण त्यांच्या सरकारने पहिल्या लसीचा आदेश जानेवारी 2021 मध्ये का दिला? अमेरिकेसह इतर देशांनी लसीसाठी हिंदुस्थानी कंपन्यांना तत्पूर्वीच ऑर्डर्स दिल्या होत्या. याची जबाबदारी कोण घेणार? घराघरात लस पोहोचवल्याशिवाय कोरोनाशी लढाई असंभव आहे.’ असे प्रियांका यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.