रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाने घेतला वेग, 3 लाख 94 हजार 344 जणांचे लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाने वेग घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 94 हजार 344 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाचे प्रमाण 33.35 टक्के आहे. यामध्ये कोविशिल्डचा 2 लाख 62 हजार 759 जणांना पहिला डोस आणि 44 हजार 363 जणांना दुसरा डोस दिला. कोवॅक्सिनचा 48 हजार 731 जणांना पहिला डोस, 38 हजार 491 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. आजपर्यंत 18 ते 44 वयोगटातील 48 हजार 600 नागरिकांना पहिला डोस, 9384 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 ते 60 वयोगटातील 1 लाख 6 हजार 127 जणांना पहिला डोस, 16 हजार 717 जणांना दुसरा डोस, 60 वर्षावरील 1 लाख 376 जणांना पहिला डोस, 26 हजार 427 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

जिल्ह्यात 3 लाख 11 हजार 490 नागरिकांना पहिला डोस, तर 82 हजार 854 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती त्यामध्ये 17 हजार 981 जणांना पहिला डोस तर 12 हजार 557 जणांना दोन्ही डोस देण्यात आला आहे. फ्रंटलाईन वर्करमध्ये 38 हजार 406 जणांना पहिला डोस, तर 17 हजार 769 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.