
कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटवरही लस येणार आहे. या लसीची निर्मिती करण्यासाठी सिरम इन्स्टिटय़ूटला ड्रग्ज पंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) मंजुरी दिली आहे. ओमायक्रोनचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनातून चाचणी आणि विश्लेषण करण्यासाठी लस बनवण्यास परवानगी द्या, अशी विनंती सिरम इन्स्टिटय़ूटने केली होती. ही विनंती डीसीजीआयने मान्य केली आहे. त्यामुळे ओमायक्रोन व्हेरिएंटवर लस येण्याचा मार्ग सुकर केला आहे.
देशात ओमायक्रोन व्हेरिएंटने कोरोनाची तिसरी लाट आणली. या लाटेचा मोठय़ा प्रमाणावर उद्रेक झाल्याने सरकारची चिंता वाढली आहे. ही लाट वेळीच पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून लसीच्या निर्मितीला चालना दिली गेली आहे. याचदरम्यान पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटने ओमायक्रोनच्या संसर्गाचा मुकाबला करण्याच्या हेतूने चाचणी आणि विश्लेषणासाठी एका लसीची निर्मिती करण्यास डीसीजीआयकडे परवानगी मागितली होती. पंपनीचा हा अर्ज 2019 मधील नवीन औषधे आणि क्लिनिकल चाचणी नियमांमधील तरतुदींच्या आधारे मंजूर करण्यात आला आहे.




























































