खासदार उदयनराजे भोसले यांची मध्यस्थी; वडार समाजाचे ‘जलसमाधी आंदोलन’ मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कराड

येथील तहसील कचेरीसमोर वडार बांधवांचे आपल्याला हक्काचे डोंगर उदरनिर्वाहासाठी मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. मात्र शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे वडार समाजाच्या बांधवांनी मंगळवारी कराड येथील कृष्णा कोयना नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मागण्यावर ते ठाम होते.

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आले होते. या आंदोलनाची माहिती कळताच त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. उपस्थित प्रशासकीय अधिकारी यांना सूचना देत वडार बांधवांचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश दिले. उदयनराजे यांच्या मध्यस्थीमुळे प्रीतिसंगमावर सुरू असलेले आंदोलन वडार बांधवांनी मागे घेतले आहे. मात्र उदयनराजे यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेला शब्द सरकार पाळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.