
मोबाईल खरेदीच्या नावाखाली व्यावसायिकाला गंडा घालू पाहणाऱयाला वाकोला पोलिसांनी चांगलाच दणका दिला. फसवणुकीचे 24 लाख 70 हजार रुपये पोलिसांनी वेळीच फ्रीज केले. वाकोला पोलिसांच्या या कामगिरीचे काwतुक होत आहे.
तक्रारदार हे व्यावसायिक असून ते त्याचे सांताक्रुझ परिसरात मोबाईलचे दुकान आहे. गेल्या आठवडय़ात त्यांना एकाने पह्न केला. होलसेलमध्ये मोबाईल देत असल्याने तक्रारदारांनी 200 मोबाईल बुक केले. मोबाईल बुक केल्यानंतर 24 लाख 70 हजार रुपये मध्य प्रदेश येथील एकाच्या खात्यात जमा केले. पैसे देऊन ही मोबाईल न आल्याने तक्रारदाराने एका नंबरवर पह्न केला. तो नंबर बंद असल्याने तक्रारदाराला संशय आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सुनयना नटे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राणे, उपनिरीक्षक अंकिता वारके, विजय ठोसर, मुकेश पाटील यांनी तपास सुरू केला.
ज्या खात्यात पैसे जमा झाले होते त्याची माहिती पोलिसांनी काढली. त्यानंतर संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱयाला संपर्क साधत मध्य प्रदेश येथील एका खासगी बँकेच्या मॅनेजरला पोलिसांनी पह्न करून त्या रकमेबाबत माहिती दिली. त्यानंतर खात्यात जमा झालेली रक्कम तक्रारदाराला परत करण्यात आली. रक्कम परत मिळाल्याने तक्रारदाराने वाकोला पोलिसांचे आभार मानले.


























































