Photo- या अभिनेत्रींनीही वठवली आहे जयललिता यांची भूमिका
1 / 9
नुकतंच कंगणा राणावत हीची मध्यवर्ती भुमिका असलेला थैलवी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
कंगणा या चित्रपटात तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भुमिकेत दिसणार आहे.
पण यापूर्वीही काही अभिनेत्रींनी जयललिता यांची भूमिका वठवली आहे.
सुप्रसिद्ध ऐश्वर्या रायने पदार्पणाच्या चित्रपटातच जयललिता यांची भुमिका बजावली आहे.
मणिरत्नम दिग्दर्शित इरुवर या तमिळ चित्रपटात ऐश्वर्याने कल्पना नावाच्या व्यक्तीची भुमिका वठवली आहे, ही व्यक्तिरेखा जयललिता यांच्यावर आधारित होती असे म्हटले जाते.
2019 साली आलेल्या क्वीन या वेबसीरीजमध्ये तीन अभिनेत्रींनी जयललिता यांची भुमिका बजावली होती.
त्यात अनिखा सुरेंद्रन या अभिनेत्रीने जयललिता यांचा बालपणातील भुमिका वठवली होती.
तर अंजना जयप्रकाश या अभिनेत्रीने तरुणपणीतील जयललिता साकारली होती.
तर सुप्रसिद्ध अभिनेत्री रम्या कृष्णन यांनी प्रौढ जयललिताची भुमिका वठवली होती.