कौतुकास्पद! वरुणने 200 बॅकग्राऊंड डान्सरना दिला मदतीचा हात

797

लॉकडाऊनमध्ये इंडस्ट्री ठप्प असल्याने बॅकग्राउंड डान्सर अडचणीत आहेत. अभिनेता वरुण धवन याने बॉलीवूडमधील 200 डान्सरना मदतीचा हात दिला आहे. लॉकडाऊनमध्ये वरुणने बॅकग्राऊंड डान्सरच्या खात्यात थेट रक्कम पाठवली आहे. राज सुरानी या डान्सरने याबाबतची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली आहे. सुरानी यांनी सांगितले, वरूणने गरजू डान्सरना आर्थिक मदत केली. यापैकी काहींनी वरूणसोबत तीन डान्सवर आधारित सिनेमांत काम केलेले आहे. अनेक डान्सर संकटात आहेत. घरभाडे द्यायलाही त्यांच्याकडे पैसे नाहीत. काही जणांकडे आईवडिलांच्या औषधालाही पैसे नाहीत. त्यामुळे मदतीसाठी धावून येणाऱया वरूणचे आम्ही आभार मानतो. शूटींग जरी सुरू झालं असलं तरी डान्सरना अजून काम मिळायला वाट पहावी लागेल.

वरूण धवनच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर लवकरच तो सारा अली खानच्या ’कुली नंबर 1’ मध्ये दिसेल. यामध्ये अभिनेता गोविंदा यांचे लोकप्रिय गीत ’मैं तो रस्ते में जा रहा था’ वेगळ्या ढंगात बघायला मिळेल. बंगळुरू येथील भेळपुरी स्टॉल्सवर त्याचे शूटींग झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या