बॉलिवूडमध्ये लगीनघाई! वरुण धवन ‘या’ महिन्यात अडकणार विवाह बंधनात

2021 हे वर्ष कलाकारांसाठी लगीनघाईचे असणार आहे. यात आता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या नावाची भर पडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून वरुण धवन त्याच्या बालपणीच्या मैत्रीणीशी लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झालीय. या चर्चांना लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. वरुणने एका मुलाखतीत गर्लफ्रेंड नताशा दलाल हिच्यासोबत यंदा लग्न करणार असल्याचे जाहीर केलेय.

गेल्या दोन वर्षापासून अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. 2020 साली ते लग्न करणार होते. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे त्यांचा हा प्लॅन कॅन्सल झाला होता. आता पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार नताशा आणि वरुण याच महिन्यात लग्न करणार आहेत.

दरम्यन, वरुण आणि नताशा पंजाबी पद्धतीचे लग्न असणार असून कोरोनाच्या संकटामुळे जवळच्या मोजक्या लोकांनाच लग्नाचे आमंत्रण असणार आहे. अलिबाग येथे होणाऱ्या लग्नात 200 जणांची यादी तयार केली आहे. वरुण नुकताच अलिबाग येथे फाईव्ह स्टार हॉटेल बुक करण्यासाठी गेला होता. पण याबाबत दोघांच्याही कुटुंबाकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.

नुकत्याच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत वरुणने यंदा लग्न करणार असल्याचे सांगितले. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर आम्ही लग्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून आमच्या लग्नाविषयी चर्चा सुरु आहे. नेमेके लग्न कधी असणार आहे हे निश्चित नाही. सध्याची परिस्थिती पाहता, सगळं सुरळीत झाल्यावर लग्न करणार असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या