करिनाच्या ‘वीरे दी वेडिंग’वर पाकिस्तानात बंदी

9

सामना ऑनलाईन । मुंबई

१ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘वीरे दी वेडिंग’ या बहुचर्चित चित्रपटाला पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र दिले असले तरी पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासून तरुणवर्ग या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होता.

हा चित्रपट चार तरुणींच्या जीवनावर बेतलेला असून मैत्रिणींमध्ये सहज होणारे संवाद यात आहेत. या चित्रपटात नायिकांच्या तोंडी शिव्या आहेत. तसेच उघडपणे शरीरसंबंधांविषयी चर्चा घडते. त्यामुळे पाकिस्तानच्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉरने चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या