कादर खान यांची तब्येत बिघडली, व्हेंटिलेटरवर ठेवले; बिग बींची भावूक पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर कॅनडातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कादर खान यांना न्यूमोनिया झाला असून त्यांच्यावर कॅनडातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कादर खान आपल्या मुलासोबत कॅनडाला राहात आहेत. तसेच त्यांना श्वास घेण्याची अडचण निर्माण झाल्याने रेग्यूलर व्हेंटिलेटरवर न ठेवता त्यांना BiPA व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कादर खान यांच्या चांगल्या आरोग्यासाठी बॉलिवूडकरांनी देवाकडे प्रार्थना केली आहे.

जवळपास 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये कादर खान यांनी काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रकृतीच्या तक्रारी सुरू असून त्यांना यापूर्वीही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 2017 मध्ये त्यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रियाही झाली होती.