दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची तब्येत बिघडली, आयसीयूत केले दाखल

दिग्गज अभिनेत्री आणि काजोलची आई तनुजा यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रविवारी जुहू येथील एका रुग्णालयात दाखल केले असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तनुजा यांच्यावर  डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. चिंता करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वयोमानानुसार होणाऱ्या आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

तनुजा यांनी हिंदी आणि बंगाली सिनेमांमध्ये काम केले आहे. तनुजा शोभना समर्थ आणि निर्माता कुमारसेन समर्थ यांची मुलगी आहे. तनुजा नुतन यांची बहिण आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी छबीली (1960) या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ‘मेम दीदी’, ‘बहारें फिर भी आएंगी’, ‘ज्वेल थीफ’, ‘हाथी मेरे साथी’ और ‘मेरे जीवन साथी’ या सिनेमांमध्ये काम केले.