ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांचे निधन

1077

ज्येष्ठ कवी आणि नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष किशोर पाठक यांचे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. मात्र, शनिवारी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या निधनामुळे संपूर्ण साहित्य क्षेत्रात दुःखाचे सावट पसरले आहे. किशोर पाठक हे एक मराठी लेखक व कवी आहेत. संतसाहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. यशवंत पाठक यांचे ते कनिष्ठ बंधू होते.

कवी किशोर पाठक यांची साहित्यसंपदा

अंत:स्वर (नाटक)
असा कसा तसा (बालसाहित्य)
काळा तुकतुकीत उजेड (कथासंग्रह)
चुळूक बुळूक (बालकविता)
झुळ झुळ झरा (बालकविता)
जीर्ण रेषांच्या खाली (कथासंग्रह)
बेचकीत जन्मतो जीव (काव्यसंग्रह)
अंत:स्वर (नाटक)
मिटल्या पानांची झाडं (कथासंग्रह)
शुभ्र कोवळे आभाळ गाणे (काव्यसंग्रह)
सम्भवा (काव्यसंग्रह)
स्वप्न करू साकार (कविता)

आपली प्रतिक्रिया द्या