‘छावा’ने देशात 600 कोटी कमावले

विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने हिंदुस्थानात 600 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर 600 कोटी रुपये कमाई करणारा ‘छावा’ हा चित्रपट ‘पुष्पा-2’ आणि ‘स्त्री-2’ नंतरचा तिसरा चित्रपट ठरला आहे. ‘स्त्री-2’ चे लाईफटाईम कलेक्शन 627.02 कोटी, तर ‘पुष्पा-2’ ने 1200 कोटींहून जास्त कमावले आहेत. ‘छावा’ने जगभरात 807 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारीला सिनेमागृहात तर 11 एप्रिलला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.