
सामना ऑनलाईन । चिंचवड
मुंबई-बंगळुरू एक्सप्रेस हायवेवर चिंचवड परिसरात उभ्या ट्रकमधून डिझेल चोरी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुरूवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ताथवडे गावच्या हद्दीत घडलेला डिझेल चोरीचा प्रकार एका नागरिकाने त्याच्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. चोरीचा प्रकार कॅमेरात कैद होत असल्याचे लक्षात येताच चोरटे इनोव्हा गाडीतूमध्ये डिझेलचा ड्रम घेऊन पुण्याच्या दिशेने पसार झाले.
मुंबई-बंगळुरू एक्सप्रेस हायवेवर उभ्या असलेल्या गाड्यांमधून डिझेलचे चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या डिझेल चोरांची मोडस ऑपेरेंडी व्हायरल झालेल्या व्हिडीओतून समोर आली आहे. चोरटे मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास एक्सप्रेस हायवेवर उभ्या असलेल्या ट्रकच्या बाजूला त्यांची गाडी अभी करून कोणी येते का याच्यावर नजर ठेवतात. त्यांच्यातील काहीजण थेट ट्रकच्या डिझेल टाकीचे झाकन तोडून पईपाद्वारे टाकीतले डिझेल ड्रममध्ये भरतात आणि पसार होतात. या डिझेलचोरी प्रकरणी हिंजवडी पोलीस चोरट्यांचा आणि त्यांनी वापरलेल्या इनोव्हा गाडीचा शोध घेत आहेत.




























































