Video – आम्हाला पक्ष फोडायचाच होता, अखेर भाजपच्या पोटातलं ओठांवर आलंच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप सध्या देशभरात फोडाफोडीचे राजकारण करत आहे. आतापर्यंत भाजप जरी पक्ष फोडत असल्याचे थेट मान्य करत नसले तरी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अखेर ते मान्य केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन कार्यक्रमात पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना आशिष शेलार बावचळले व अखेर त्यांनी आम्हाला शरद पवार यांचा पक्ष फोडायचाच होता असे मान्य केले आहे.

एबीपी माझा वाहिनीच्या कार्यक्रमात पत्रकाराने आशिष शेलार यांना अजित पवार यांच्या सोबत 2019 मध्ये केलेली सत्तास्थापना ही त्यावेळे मतदारांनी दिलेल्या मतांचा अपमान नव्हता का असे विचारले. त्यावर आशिष शेलार यांनी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत नाही तर अजित पवार यांचयासोबत युती केल्याचे उत्तर दिले. त्यावर अजित पवार हे कोणत्या पक्षाचे होते असे विचारताच आशिष शेलार गडबडले व त्यांनी थेट आम्हाला शरद पवार यांचा पक्ष फोडायचा होता असे सांगून टाकले.