
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक संतपजनक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते एका महिला डॉक्टरचा हिजाब खेचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरूनच आता त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते १,२८३ आयुष डॉक्टरांना (आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी) नियुक्ती पत्रे देण्यात केली. यावेळी नुसरत प्रवीण नावाची एक महिला डॉक्टर नियुक्ती पत्र घेण्यासाठी आली तेव्हा तिने हिजाब परिधान केला होता. हिसाब नितीश कुमार यांनी ओढला.
नितीश कुमार यांचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसने यावर टीका केली आहे. काँग्रेसने आपल्या अधीकृत X अकाउंटवर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, “जेव्हा एक महिला डॉक्टर तिचे नियुक्ती पत्र घेण्यासाठी आली, तेव्हा नितीश कुमार यांनी तिचा हिजाब खेचला. बिहारमधील सर्वोच्च पदावर असलेला माणूस सार्वजनिक ठिकाणी असे घृणास्पद कृत्य करत आहे. कल्पना करा की, राज्यात महिला किती सुरक्षित असतील? या घृणास्पद कृत्याबद्दल नितीश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. हे घृणास्पद कृत्य अक्षम्य आहे.”
View this post on Instagram



























































