ठाण्यात उड्डाणपुलावर गळफास घेण्याचा प्रयत्न, थरारक सुटकेचा व्हिडीओ व्हायरल

1842

ठाण्यातील कळवा येथे मंगळवारी थरारक घटना घडली. कळवा ब्रिजवर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहतूक पोलीस आणि जागरूक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्याने या तरुणाचा जीव वाचला आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कळवा इथे आत्महत्येपासून वाचवण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव भगवान कांबळे (40) असे असून नुकतेच त्यांच्या मुलाचे निधन झाले. याचा त्यांना जबर मानसिक धक्का बसल्याने व कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ते कळवा नाका ब्रिजवर पोहोचले आणि त्यांनी सोबत आणलेला दोरखंड उड्डाणपुलावरील रेलिंगला बांधला व गळफास घेतला. मात्र हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने नागरिकांनी पोलिसांना सांगितले. यानंतर हायड्रा (मशिन) लावून कांबळे यांना खाली उतरवण्यात आले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ –

आपली प्रतिक्रिया द्या