व्हिडीओ : मुलींनी ‘अशी’ कंबर हलवली अन् आईने चपलाने तुडवली

सामना ऑलनाईन । नवी दिल्ली

सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी चित्र-विचित्र फोटो, व्हिडीओ सातत्याने अपलोड होत असतात. सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुली डान्स करताना दिसत असून अचानक त्यांची आई त्या ठिकाणी येते आणि मुलींची चपलाने धुलाई करते.

व्हिडीओमध्ये दोन मुली एका रूममध्ये गाण्याच्या आवाजावर डान्स करताना दिसत आहे. कंबरतोड डान्स करताना अचानक त्यांची आई त्या ठिकाणी येते. मुलींच्या डान्स स्टेप पाहून आईचा पारा चढतो आणि ती पायातील चप्पल काढून त्यांना बदडून काढते. हा व्हिडीओ स्पेनमधील असल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर हा कोणी अपलोड केला याचा थांगपत्ता लागलेला नाही परंतु नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ चांगलाच उचलून धरला आहे.

पाहा व्हिडीओ –

आपली प्रतिक्रिया द्या