विद्याधर अनास्कर यांना ‘सहकार महर्षी’ पुरस्कार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि ‘सहकारी महाराष्ट्र’च्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेला पहिला ‘सहकार महर्षी’ पुरस्कार राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांना देण्यात आला. तर, वारणा उद्योग समूहाचे प्रमुख, आमदार विनय कोरे यांना ‘सहकार भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधून नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सहकार गौरव पुरस्कार सोहळा 2026 आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱया विविध व्यक्ती व संस्थांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. डॉ. रेवती पैठणकर यांना ‘सहकार रत्न’, दीपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव’, शोभाताई सावंत यांना ‘महिला सहकार शक्ती’, शिवाजीराव नलावडे यांना ‘सहकार विभूषण’ने तर ज्ञानदीप सहकारी पतसंस्थेला आदर्श सहकारी पतसंस्था या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय सहकारातील इतर कार्यकर्त्यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात आला. राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर हे यावेळी उपस्थित होते.