
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनकच असून, ते व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या 15 दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गोखले यांच्यावर उपचार सुरू आहेत.
विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाहीत तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाही. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका, डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, असे गोखले यांचे निकटवर्तीय राजेश दामले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानेही प्रसिद्धीपत्रक जारी केले असून, विक्रम गोखले यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती दिली.
























































